⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव जिल्ह्यात आज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवे रुग्ण अधिक, वाचा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात नवीन रुग्ण संख्या १० च्या आत आढळून येत आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधित अधिक आढळून आली आहे. दिवसभरात जिल्ह्यात ०७ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज ०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकही मृत्यूची नोंद नाहीय. आज जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाहीय.

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १,४२,५७९ इतकी झाली आहे. त्यात उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ९१९ वर आहे. जिल्ह्यात सध्या ८५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीय. जिल्ह्यात आज पर्यंत २५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८.१३ वर गेला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-०२, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ -०१, अमळनेर -०१, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर -००, पारोळा-०, चाळीसगाव-०२, मुक्ताईनगर-००, बोदवड-०० असे एकुण ७ बाधित रूग्ण आढळले आहे.