fbpx

होय कोरोना हरतोय… आज जळगाव जिल्ह्यात फक्त १९४ नवीन कोरोना रुग्ण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वेगाने कमी होत आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात १९४ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल २१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या तीन चार दिवसांत दुपटीने रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. शिवाय, मृतांचा आकडा देखील खाली असला तरी दिवसभरात ६ जणांचा मृत्‍यू झाला.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३९ हजार ३३१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३० हजार २७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ६ हजार ५३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

जळगाव शहर-२२, जळगाव ग्रामीण-१३, भुसावळ-१५, अमळनेर-०, चोपडा-११, पाचोरा-५, भडगाव-१, धरणगाव-५, यावल-२१, एरंडोल-७, जामनेर-१३, रावेर-२० पारोळा-२, चाळीसगाव-३४, मुक्ताईनगर-५, बोदवड-१३ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण १९४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज