⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्ण संख्या : अडीचशे पेक्षाही कमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वेगाने कमी होत आहे. आज बुधवारी जिल्ह्यात २२१ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ३३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या तीन चार दिवसांत दुपटीने रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. शिवाय, मृतांचा आकडा देखील खाली असला तरी दिवसभरात ७ जणांचा मृत्‍यू झाला.

जळगाव जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार १३७ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ३० हजार ०५७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सद्यस्‍थितीला ६ हजार ५७० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अर्थात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्‍याने ॲक्‍टिव रूग्‍णांची संख्या देखील आणखी कमी होईल. तर गेल्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २५१० वर गेला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-३३, जळगाव ग्रामीण-१३, भुसावळ-४, अमळनेर-८, चोपडा-५, पाचोरा-१, भडगाव-५, धरणगाव-१, यावल-१९, एरंडोल-३, जामनेर-३६, रावेर-२३, पारोळा-५, चाळीसगाव-३६, मुक्ताईनगर-१३, बोदवड-१४ आणि इतर जिल्ह्यात २