⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जळगाव जिल्ह्यातील आजची अधिकृत कोरोना आकडेवारी : २६ जून २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गात दिवसेंदिवस घट होत आहे. दोन महिन्यांपासून सुरु असलेला हा ट्रेंड कायम असून आज शनिवारी दिवसभरात ३५ बाधित रूग्ण आढळले आहे. तर १०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या २४ तासात एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीय.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. दोन महिन्यांपासून नव्या रुग्णांमध्ये घट होत असून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. शनिवारी ४  हजार ५५६  चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी ३५ बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण. बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार १८६ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार ८१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २५७० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ८०२ रुग्णावर उपचार सुरु आहे.

आजचे रुग्ण

जळगाव शहर- ०४ , जळगाव ग्रामीण- ०१ , भुसावळ- ०२ , अमळनेर-00 , चोपडा ०२, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-०२, यावल- ०१, एरंडोल- ०२, जामनेर-०२, रावेर-०१, पारोळा-०२, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०० आणि इतर जिल्हे ०० असे एकुण ३५ बाधित रूग्ण आढळले आहे.