⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

टेन्शन वाढलं ! गेल्या 24 तासांत देशातील रुग्णसंख्येत मोठी वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत होता. तसेच देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा हा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडा वाढला आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे ४६,१६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ६०७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३,२५,५८,५३० वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ४३६३६५ वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ३,३३,७२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

३,१७,८८,४४० हे रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याच दरम्यान टेन्शन वाढलं आहे. कारण फक्त दोन दिवसांत नव्या रुग्णांची संख्या ही दुप्पट झाली आहे.

दरम्यान, त्याआधी मंगळवारी (24 ऑगस्ट) 25467 नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र आज त्याच्या जवळपास दुप्पट नव्य़ा रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी (25 ऑगस्ट) 37593 नवे रुग्ण सापडले होते.

केरळमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची सर्वाधिक संख्या ही केरळमध्ये आहे. बुधवारी केरळमध्ये 31445 रुग्ण नवे रुग्ण आढळले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंट अधिक संक्रमक असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता डेल्टाचं 74 टक्के संक्रमण हे लक्षणं दिसण्याआधीच झाल्याचं समोर आलं आहे. एका रिसर्चमधून हा दावा करण्यात आला आहे.