⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जिल्ह्यात कोरोना तांडव : १०९३ नवीन कोरोना रुग्ण आढळले; आज १२ रुग्णांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरूच आहे. विशेषकरून जळगाव शहरातील परिस्थिती गंभीर होत आहे. आज जिल्ह्यात नवीन १०९३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

आज जळगाव शहर ३५६, जळगाव तालुका-३६; भुसावळ ६६, अमळनेर-७६; चोपडा-१००; पाचोरा-१२; भडगाव-१२; धरणगाव-७०; यावल-४३; एरंडोल-५५; जामनेर-३१; पारोळा-२५; चाळीसगाव-९५; मुक्ताईनगर-३३; बोदवड-३३ आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकूण १०९३ रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात मृत्यूचा तांडव; आज १२ रुग्णांचा मृत्यू

आजच्या रुग्ण वाढीनंतर जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ७९ हजार ५६३ वर गेली आहे. त्यात ६८ हजार ०७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून जिल्ह्यात मृताच आकडा वाढला असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.  आज तब्बल १२ बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृताचा एकूण आकडा १५१३ वर गेला आहे. जिल्ह्यात ९ हजार ९७७ रुग्ण उपचार घेत आहे