⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचा एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ ।  जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असला, तरी गेल्या आठवडाभरापासून दररोज बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या पन्नासच्या घरात स्थिर आहे.  दरम्यान, आज बुधवारी दिवसभरात कोरोनाचे ४३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज पुन्हा जिल्ह्यात एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीय. यामुळे हा जिल्ह्यासाठी एक मोठा दिलासा आहे. जिल्ह्यात आज १६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी होवून रुग्ण संख्या देखील कमी झाली. त्यात काही तालुक्यात एक ही रुग्ण आढळून येत नाही. तर मागील तीन दिवसापासून मृत्यूचे सत्र थांबले आहे. 

गेल्या २४ तासांत आणखी ४३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ०७२ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार ४१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.  जिल्ह्यात आजपर्यंत २५६९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १०९१ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आजचे रुग्ण

जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ-०४, अमळनेर-००, चोपडा-०२, पाचोरा-०२, भडगाव-०१, धरणगाव-०३, यावल-०२, एरंडोल-०३, जामनेर-०४, रावेर-०२, पारोळा-०१, चाळीसगाव-०३, मुक्ताईनगर-००, बोदवड-०१ आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ४३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.