fbpx

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून, नव्या रुग्णांची संख्या आता पन्नासच्या टप्प्यात आली आहे. सोबतच जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत चार महिन्यानंतर प्रथमच आज रविवारी एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे हा जिल्ह्यासाठी मोठा दिलासादायक बाब आहे. आज रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे ४८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ११७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. 

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्गासोबतच मृताचा आकडाही कमी होत असल्याने सध्या दिलासादायक चित्र आहे. आज रविवारी प्राप्त अहवालात ४८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४१ हजार ९३४ झाली आहे, तर ११७ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३८ हजार ००१ वर पोचला आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २५६८ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या १३६५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७.२३ टक्के झाला आहे.  

जळगाव शहर-०५, जळगाव ग्रामीण-०२, भुसावळ-००१, अमळनेर-०३, चोपडा-०२, पाचोरा-०२, भडगाव-०२, धरणगाव-०३, यावल-०३, एरंडोल-०३०, जामनेर-०८, रावेर-०४, पारोळा-०३, चाळीसगाव-०६, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज