⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात नवे बाधित पाचशेच्या आत

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ ।  जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना संसर्ग कमी होतानाचे दिसून येत आहे. जिल्ह्यात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या आता पाचशेच्या आत आली असून आज बुधवारी ४९४ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.  तर ५१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तीव्रता मार्च व एप्रिल महिन्यात प्रचंड वाढल्यानंतर मे महिन्यात उतरता आलेख सुरु झाला आहे. तीन आठवड्यांपासून दररोजचे बाधित कमी व बरे होणारे अधिक आढळून येत आहेत. दरम्यान, आज बुधवारी रॅपीड ॲन्टीजेन व आरटीपीसीआर अशा ७ हजार ७९४ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत. त्यामुळे नवे ४९४ रुग्ण आढळून आले असून त्यामुळे जिल्ह्यातील  एकूण रुग्णसंख्या १ लाख ३६ हजार ७७९ वर पोचली. तर ५१२ रुग्ण बरे झाले असून बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २४ हजार ८५८ इतका झाला आहे. बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने रिकव्हरी रेट ९१.२८ टक्के झाला आहे. सध्या जिल्ह्यात ९ हजार ४७१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान, बुधवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत १२ जणांचा बळी गेला असून बळींचा आकडा २४५० झाला असून नॉन कोविड, सारी, न्युमोनिया व कोविड संशयित अशा ६ जणांचा मृत्यू झाला.

आजची आकडेवारी

जळगाव शहर ४४, जळगाव ग्रामीण १७, भुसावळ ७८, अमळनेर १८, चोपडा ४९, पाचोरा ०९, भडगाव ०१, धरणगाव २५, यावल ३३, एरंडोल २२, जामनेर ३४, रावेर ३१, पारोळा ०७, चाळीसगाव ४७, मुक्ताईनगर ४०, बोदवड ३७, अन्य जिल्ह्यातील .२.