⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी : १८ एप्रिल २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. आज जळगाव जिल्ह्यात नवीन १०५९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आता जळगाव जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १ लाख ९ हजार २७७ वर पोचली आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांचा आकडा ९६ हजार १५३ वर पोचला आहे.  दरम्यान, जिल्ह्यात मृताचा आकडा मात्र वाढताच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २२ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बळींची संख्या १९३१ झाली आहे.

जळगाव शहर- १९०, जळगाव ग्रामीण- १२, भुसावळ- १७१, अमळनेर- २२, चोपडा- १३२, पाचोरा- ६६, भडगाव- ५२, धरणगाव- ४२, यावल- ६५, एरंडोल- ६७, जामनेर- ६८, रावेर ३९, पारोळा- ३७, चाळीसगाव – ३६, मुक्ताईनगर- ८, बोदवड- ५९ आणि इतर जिल्हे १३ असे एकुण १ हजार ५९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.