fbpx

पुन्हा दिलासा : जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा घटला

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोना नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. यामुळे जळगावकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.

आज ९३४ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या १ लाख ०६ हजार ०७० झाली आहे. तर आज ११७४ कोरोना रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ९२ हजार ८७३ वर गेली आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला कोरोना मृताच आकडा वाढतच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज २० रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १८६८ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे.

आज जळगाव शहर २२०, जळगाव तालुका ४३, भुसावळ ४२, अमळनेर २४; चोपडा ७३; पाचोरा ८; भडगाव १२; धरणगाव ५८; यावल ३१; एरंडोल ८४, जामनेर ८५; रावेर १०६, पारोळा २६; चाळीसगाव ६३, मुक्ताईनगर ४०; बोदवड ८ आणि इतर जिल्ह्यातील ११ असे ९३४ रूग्ण आढळून आले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज