fbpx

जळगाव जिल्ह्यात आज कोरोनातून बरे झालेले रुग्ण ११९५ तर पॉझिटिव्ह रुग्ण ९८४

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून रोज अकराशे ते बाराशेपर्यंत रुग्ण संख्या आढळून येत होती मात्र, आज जिल्ह्यात थोडासा दिलासादायक चित्र दिसून आले. आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची अधिक आहे. त्यात आज ९८४ नवे रुग्ण आढळून आले आहे तर ११९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

जळगाव जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत कोरोना संसर्ग आजाराचा फैलाव वाढला आहे. दररोज अकराशे, बाराशे रुग्ण समोर येत आहे. मात्र आज हजाराहून कमी रुग्ण संख्या आढळून आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र मृताच्या वाढत्या आकड्याने पुन्हा चिंता वाढली आहे. आज विक्रमी २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १८४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज ९८४ रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १ लाख ५ हजार १३६ इतकी झाली आहे. तर आज ११९५ कोरोना रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ९१ हजार ६९९ वर गेली आहे.

आज जळगाव शहर २११, जळगाव तालुका ७५, भुसावळ ७८, अमळनेर ३६; चोपडा १२; पाचोरा १७; भडगाव ३४; धरणगाव ४६; यावल ६७; एरंडोल ७३, जामनेर २०; रावेर ८६, पारोळा ०६; चाळीसगाव ५९; मुक्ताईनगर १५८; बोदवड ०० आणि इतर जिल्ह्यातील ०५ असे ९८४ रूग्ण आढळून आले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज