कोरोनाचा पुन्हा उच्चांक, आज आढळले तब्बल २२१ रुग्ण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचा उच्चांक पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यात जवळपास आठ ते नऊ महिन्यानंतर नव्या कोरोना बाधितांची संख्या २०० च्या वर गेली आहे. आज बुधवारी २२१ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर आज ६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असली तरी दुसरीकडे दिलासादायक बाब अशी की, गेल्या काही दिवसपासून जिल्ह्यात एकही मृत्यूची नोंद नाहीय. आज देखील एकही मृत्यूची नोंद झालेली नाहीय.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज २११ रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ४३ हजार ६०७ इतक्यावर गेली आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २५७९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ७६७ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आजचे आढळून आलेले रुग्ण
आजच्‍या बाधितांमध्‍ये जळगाव शहरात ४३, जळगाव ग्रामीण ०४, भुसावळ १०७, चोपडा ३२, पाचोरा ५, एरंडोल ५, पारोळा २, चाळीसगाव १४, मुक्ताईनगर १, बोदवड १ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण २११ बाधित रूग्ण आढळले आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -