fbpx

समाधानकारक : आज जळगाव जिल्ह्यातील १ हजार ११६ रुग्णांनी कोरोनाला हरवले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातून रोज १ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाला हरवून बरे होत आहेत. आज १, ११६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज ११६७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज १११६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, आज १७ जणांचा मृत्‍यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत १७९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, जिल्ह्यात आतापर्यत १ लाख १ हजार ८०८ रुग्ण बाधित झाले आहे. त्यापैकी ८८ हजार २६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात सध्या ११ हजार ७५० रुग्ण उपचार घेत आहे.

आज जळगाव शहर २३३, जळगाव तालुका ४०, भुसावळ १२०, अमळनेर १०१; चोपडा ६९; पाचोरा ४०; भडगाव ३६; धरणगाव ४३; यावल ६८; एरंडोल १३२, जामनेर ११८; रावेर ६१९, पारोळा २१; चाळीसगाव १३, मुक्ताईनगर ०६; बोदवड ५३ आणि इतर जिल्ह्यातील १३ असे ११६७ रूग्ण आढळून आले आहेत.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज