⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

सकारात्मक बातमी : जळगाव जिल्ह्यात आज १ हजार १६० रुग्ण कोरोनातून बरे झाले

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस हातभार जात असतांना रोज १ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. आज जळगाव जिल्ह्यात १ हजार १६० रुग्णांनी कोरोनावर मत केली आहे.

आज ११८५ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज ११६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. मात्र चिंतेची बाब म्‍हणजे कोरोनामुळे मृत्‍यू होणाऱ्या आकडा वाढताच आहे. गेल्‍या काही दिवसांपासून एका दिवसात चौदा- पंधरा रूग्‍णांचा मृत्‍यू होत होता. मात्र आज १८ जणांचा मृत्‍यू झाला असून, हा आतापर्यंत एका दिवसात मृत्‍यू झालेल्‍यांचा सर्वात मोठा आकडा आहे.

दिवसभरात १८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत १७७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १ लाखाच्यावर गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यत १ लाख ६४१ रुग्ण बाधित झाले आहे. त्यापैकी ८७ हजार १४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात सध्या ११ हजार ७१६ रुग्ण उपचार घेत आहे.

आज जळगाव शहर २८७, जळगाव तालुका ९३, भुसावळ १९६, अमळनेर १०३; चोपडा १२; पाचोरा ७९; भडगाव ४५; धरणगाव ४१; यावल ३०; एरंडोल ७९, जामनेर ४४; रावेर ६९, पारोळा२९; चाळीसगाव ५९, मुक्ताईनगर ०८; बोदवड ३७ आणि इतर जिल्ह्यातील ०३ असे ११८५ रूग्ण आढळून आले आहेत.