fbpx

कोरोना अपडेट्स : जळगाव जिल्ह्यात आज नवीन ८५८ रुग्ण, १००५ कोरोनामुक्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी बरे होणाऱ्यांचा आकडा नव्या रुग्णांपेक्षा अधिक आढळून येत आहे. आज गुरुवारी ८५८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १००५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. १६ जणांचा दिवसभरात बळी गेला.

जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित झालेल्या १ लाख २७ हजार ३११ रुग्णांपैकी १ लाख १५ हजार ४७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र जिल्ह्यात मृत्यू सत्र सुरूच आहे. आज १६  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २२८८ वर गेला आहे. सध्या जिल्ह्यात ९ हजार ५४९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९०.७० टक्क्यांवर पोहचले आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर १३४, जळगाव ग्रामीण ३५, भुसावळ १२०, अमळनेर २५, चोपडा ४१, पाचोरा ७५, भडगाव ०९, धरणगाव २२, यावल ३२, एरंडोल २३, जामनेर

२१, रावेर ३२, पारोळा २३, चाळीसगाव १०७, मुक्ताईनगर ६५, बोदवड ४७, अन्य जिल्ह्यातील ११ असे एकूण ८५८ नवीन रुग्ण आढळून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज