fbpx

दिलासादायक : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पुन्हा हजाराखाली

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होतानाचे दिसून येत आहे. आज सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक आहे. आज दिवसभरात ९३६ रुग्ण आढळले आहे. तर आजच १ हजार ६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या २४ तासांत १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तिव्रता मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र तीन आठवड्यांपासून काहीअंशी कोरोना रुग्ण संख्या कमी होत असतांना दिसत आहे. तसेच बरे होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. आज शनिवार तब्बल ८ हजार १७५ चाचन्याचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९३६ नवे बाधित रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख २२ हजार ९४० वर पोचली.

mi advt

तर आज १ हजार ६१ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १० हजार २२० वर गेला आहे. तर१६ जणांच्या मृत्यूने बळींची संख्या २ हजार २०० वर पोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या १० हजार ५२० रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जळगाव जिल्ह्यात सुरवातील मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे व बरे होणारे वाढत आहेत. आज १५३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आजच २१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरात आतापर्यंत ५०६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहरात १५३, जळगाव ग्रामीण ३६, भुसावळ १३१, अमळनेर ९६, चोपडा ४२, पाचोरा ५८, भडगाव १८,  धरणगाव ३०, यावल ३३, एरंडोल २६, जामनेर ५२, रावेर ६५, पारोळा २२, चाळीसगाव ८६, मुक्ताईनगर २५, बोदवड ४८, अन्य जिल्ह्यातील १७ असे एकूण ९३६ रुग्ण आढळून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज