fbpx

जळगाव जिल्ह्यातील आजची अधिकृत कोरोना आकडेवारी : ०१ जून २०२१

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात येत असल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. १ मे पासून सातत्याने नवीन रुग्ण कमी होत असून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढते आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब आहे. आज मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात १५७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ५७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.  गेल्या २४ तासात ०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मागील गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या बाधितांची संख्या कमी होऊ लागली असून बरे होणारे वाढू लागले आहे. यात प्रशासनाकडून लावण्यात आलेले लॉकडाउनचा देखील मोठा प्रभाव पडल्याने कोरोनाचा संसर्ग कमी झालेला दिसत आहे. नव्याने बाधितांची संख्या कमी होत असून, त्यामुळे सक्रिय रुग्णही घटले आहेत. हा सर्वात मोठा दिलासा आहे. जिल्ह्यात सध्या ५ हजार १५८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९४.५१ वर गेला आहे.

एकूण आकडेवारी

आजच्या रुग्ण वाढीनतंर  जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ४० हजार १४२ इतकी झाली आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांचा एकूण आकडा १ लाख ३२ हजार ४४९ वर पोचला आहे.  तर गेल्या २४ तासांत ३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा २५३५ वर पोचला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-२९, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-०३, अमळनेर-०४, चोपडा-२, पाचोरा-०६, भडगाव-०५ , धरणगाव-०३, यावल-०५, एरंडोल-०३, जामनेर-०९, रावेर-०३, पारोळा-०४, चाळीसगाव-६०, मुक्ताईनगर-००, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १५७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज