fbpx

जळगाव जिल्ह्यात आज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवे बाधित जास्त; वाचा आकडेवारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज जवळपास दोन ते अडीच महिन्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या बाधित रुग्णांची संख्या अधिक असल्याचे प्राप्त अहवालातून दिसून येत आहे. आज मंगळवारी दिवसभरात १२ नवे रूग्ण आढळून आले आहे. तर आज १० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकही मृत्यूची नोंद नाहीय. जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाने थैमान घातले होते. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजारावर गेली होती. एप्रिल महिन्यात नव्या बधितांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आढळून येत होते. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणत कमी झाली. दरम्यान आज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवे बाधित अधिक आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १,४२,५३४ इतकी झाली आहे. त्यात  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ८४५ वर आहे. जिल्ह्यात सध्या ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आज पर्यंत २५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

GRF Advt
बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज