⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगाव जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर ; सक्रिय रुग्णाची संख्या २००च्याही खाली

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील दोन दिवसापासून नवीन रुग्ण संख्या दहाच्या आत आढळून येत आहे. आज पुन्हा जिल्ह्यात ५ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीय.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गावरील नियंत्रणात मोठा टप्पा गाठला गेला आहे. लॉकडाउन, त्यानंतरच्या अनलॉकच्या प्रक्रियेतील निर्बंधांमुळे संसर्ग आटोक्यात येत आहे. बरे होणाऱ्यांची संख्या नव्या बाधितांपेक्षा वाढतीच असल्याने सक्रिय रुग्ण आता २००च्याही खाली आले आहेत, तर १५ पैकी १३ तालुक्यांमध्ये आज एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाहीय.

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहरात मागील दोन दिवसापासून कोरोनाचा एकही नवीन बाधित रुग्ण न सापडल्याने आरोग्य यंत्रणेसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून एकही रुग्णांची नोंद नसल्याने हा देखील मोठा दिलासा आहे. आज सापडलेल्या रुग्ण संख्येनंतर जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १,४२,४८० इतकी आहे. त्यापैकी १,३९,७१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्ण १८९ वर आहे. एकूण मृताचा २५७४ वर गेला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- ०० , जळगाव ग्रामीण- ०० , भुसावळ -०१ , अमळनेर -००, चोपडा -००, पाचोरा -००, भडगाव -००, धरणगाव -००, यावल ००, एरंडोल ००, जामनेर -००, रावेर ००, पारोळा -००, चाळीसगाव -०४, मुक्ताईनगर- ००, बोदवड -०० आणि इतर जिल्हे ०० असे एकुण ०५ बाधित रूग्ण आढळले आहे.