जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर यांना कोरोना

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२१ । जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना कोरनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. काल अचानक त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून, श्री देवकर हे कोरोना बाधित असल्याचे आढळून आले.

लक्षणे सौम्य असल्याने त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. डॉक्टर घरीच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. गेल्या दोन दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आपापली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन श्री.देवकर यांनी केले आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर आपण कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -