‘या’ राज्यातून जळगाव जिल्ह्यात आले तर करावी लागेल कोरोना चाचणी; जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील वाढत्या कोरोना आकडेवारीमुळे प्रशासनातर्फे दिवसेंदिवस कडक उपायोजना राबवण्यात येत आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी काही अतिसंवेदनशील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करणे सक्तीचे केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली व उत्तराखंड राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी करून घेणे सक्तीचे राहणार आहे. या राज्यांमधून जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, रावेर या स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांची माहिती रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास देणे सक्तीचे असेल.

तसेच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्रवाशांची अँटीजन कोरोना चाचणी करणे आवश्यक असेल. या चाचणीत पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज