fbpx

रावेर येथे शनिवारपासून ‘कोरोना प्रतिबंधक लसीकरण विशेष मोहीम’

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । रावेर शहरात शनिवारपासून मिशन कवचकुंडलअंतर्गत वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळया ठिकाणी विशेष लसीकरण मोहीम ग्रामीण रुग्णालय व नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. कोरोना लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘मिशन कवचकुंडल’ अंतर्गत रावेर शहरात विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांनी याचा लाभ घेऊन रावेर शहराचे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. एन.डी महाजन, रावेर नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.

mi advt

असे होईल लसीकरण
शनिवार दि. ९ आक्टोंबर रोजी इमामवाडा, छत्रपती शिवाजी चौक, स्वामी विवेकानंद चौक, दि.१० ऑक्टोबर रोजी संभाजीनगर, पाण्याच्या टाकीचा भाग, भोईवाडा. दि.११ ऑक्टोबर रोजी गांधी चौक, चावडी, बाविशे गल्ली. दि.१२ ऑक्टोबर विद्यानगर-स्वामी समर्थ मंदिर, शिक्षक काँलनी, रेल्वे स्टेशन. दि.१३ ऑक्टोबर रोजी श्रीकृष्ण नगर, तडवी काँलनी, अग्रसेन भवन. दि.१४ ऑक्टोबर रोजी इदगाह रोड, फिल्टर प्लान्ट, पंचमुखी हनुमाननगर आदी भागात कोराना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज