किराणा व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापना नियमीत सुरू ठेवाव्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने किराणा दुकानासह भाजीपाला व इतर अत्यावश्यक सेवांचा वेळ सकाळी ७ ते ११ निश्चित केला आहे. राज्य सरकारकडून अद्याप याबाबत कोणतेही आदेश काढण्यात आले नाही. 

राज्य शासनाचे आदेश प्राप्त होत नाही तोवर जळगाव जिल्हाधिकारी श्री.अभिजीत राऊत साहेबांच्या आदेशांचे पालन करण्यात यावे. अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सर्व व्यापाऱ्यांनी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवाव्या.

जळगाव मनपा अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा झाली असून पोलीस प्रशासनाला देखील कळविण्यात आले आहे. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळतर्फे सर्व किराणा दुकानदार आणि अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापना कोरोना संदर्भात असलेल्या नियमांचे पालन करून सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत सुरू ठेवाव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

– ललित बरडीया,

सचिव, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ, मो.9422215562

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज