fbpx

कोरोनाचा कहर, देशातील टॉप 10 शहरांमध्ये जळगावचा समावेश

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातही महराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे देशात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित पहिल्या 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहरांचा समावेश आहे. तर एक शहर कर्नाटक राज्यातील आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ९ शहरांमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोख वर काढले असून दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मागील काही दिवसापासून ११ ते १२ रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढली आहे.

दरम्यान, देशातील 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहरांचा समावेश आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारकडून अधिक कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्रातील शहरे
पुणे
नागपूर
मुंबई
ठाणे
नाशिक
औरंगाबाद
नांदेड
जळगाव
अकोला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज