प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! रेल्वेने केल्या ‘या’ गाड्या रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ती अति भयंकर दिसून येत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने रुग्ण संख्या आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर १ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे काही प्रवाशी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.

त्यात मुंबई-अमृतसर आणि पुणे-काझीपेठ विशेष गाडी पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे. यात गाडी क्रमांक ०१०५७ डाऊन मुंबई-अमृतसर ही २० एप्रिलपासून, गाडी क्रमांक ०१०५८ अप अमृतसर-मुंबई ही २३ एप्रिलपासून, गाडी क्रमांक ०१२५१ डाऊन पुणे-काझीपेठ २३ पासून, गाडी क्रमांक ०१२५२ अप काझीपेठ-पुणे विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी रेल्वे विभागाने केलेल्या या बदलाची नाेंद घ्यावी, असे अावाहन करण्यात अाले अाहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज