जिल्ह्यावर पुन्हा कोरोनाचे संकट? एकाच दिवशी आढळले चार बाधित

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ ।   शहरात गेल्या आठ दिवसांपासून काेराेनाचा एकही बाधित समाेर आलेला नव्हता. त्यात खंड पडून शुक्रवारी शहरात एकाच दिवसात चार नवीन बाधित समाेर आले. विशेष म्हणजे यापैकी तीन बाधित हे एकाच कुटुंबातील असून, त्यात दाेन महिला व एका प्राैढाचा समावेश आहे. चाैथा बाधित हा सानेगुरुजी काॅलनीत राहणारा २९ वर्षीय तरुण आहे. हे चाैघे बाधित खासगी प्रयाेगशाळेत केलेल्या तपासणीतून समाेर आले आहेत.

जिल्ह्यात शुक्रवारी ४९८ आरटीपीसीआर तपासण्या केल्या. ३६० निगेटिव्ह तर चार बाधित समाेर आले. रॅपीड अँटीजेन टेस्ट ३२७ केल्या. त्या निगेटीव्ह आल्या. जिल्ह्यत सक्रीय रुग्णांची संख्या आठ झाली असून, त्यापैकी सात रुग्ण लक्षणे असलेले आणि लक्षणे असलेला एकमेव रुग्ण आहे. नव्याने बाधित आलेल्या चार रुग्णांपैकी तीन जण हे शिवाजी नगरातील भारत नगरचे रहिवासी आहेत. तीन जण एकाच कुटुंबातील आहेत. त्यात ३० वर्षीय व ४८ वर्षीय महिला, ५८ वर्षीय प्राैढ आहेत. या कुटुंबातील सहा जणांची शुक्रवारी खासगी प्रयाेगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यात या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या बाधितांना संसर्गाची हिस्ट्री नाशिक शहराशी आहे. या कुटुंबातील नाशिक येथील नातेवाइकांच्या संपर्कात हे आले होते.

नाशिक येथील नातेवाईकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर यांनी स्वत:हून तपासण्या करून घेतल्या. त्यात सहापैकी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. चौथा बाधित हा सानेगुरुजी कॉलनीतील रहिवासी असून त्यांचे वय २९ वर्ष आहे.

जीएमसीत आयसोलेशन वॉर्ड : जीएमसीत कोरोना व संसर्ग विलगीकरण कक्ष नव्हे तर आयसोलेशन वॉर्ड स्थापन करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मील भाऊराव नाखले यांनी कळविले आहे..

उद्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची हाेणार तपासणी

शहरात दहा दिवसाच्या खंडानंतर नवीन बाधित समाेर अाले अाहेत. या सर्वांच्या अहवालांची माहिती महापालिकेला संध्याकाळी प्राप्त झाली. उद्या सकाळी संबधित भागात जावून त्या कुटुंबांच्या संपर्कात अालेल्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजीव पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar