रावेर येथे रक्तदान शिबिरात १०० दात्यांचे योगदान

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । माेहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अस सुफाहा एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीतर्फे रावेर शहरातील शौकत मैदानात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

नगराध्यक्ष दारा मोहम्मद जाफर मोहम्मद यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. रक्तदान शिबिर आयोजित करून एक स्तुत्य कार्य संस्थेने केले आहे असे गाैरवाेद्गार नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी यावेळी काढले. ब्लड बँकेकडून रक्तदात्याला प्रमाणपत्र व ५० हजारांचा अपघाती विमा, गरजेनुसार रक्तदानाची सुविधा देण्यात येणार आहे. यावेळी जमात-ए-इस्लामीचे शफीओद्दीन शेख, इरफान शेख, अयुब पठाण, गोपाळ बिरपन, अब्दुल समद शेख, हमीद इक्बाल शेख, शाकिर शेख, रहेमान शेख आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी रेड प्लस ब्लड बँकेच्या अमोल शेलार, वीरेंद्र बिऱ्हाडे, गोविंदा जाधव, तुषार दुसाने, रवींद्र सूर्यवंशी, राजेंद्र इंगळे, रहिब खाटीक, दानिश शेख यांच्यासह सुफाहा सोसायटीच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज