fbpx

सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण बंद, ६७०० डोस मिळण्याची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यातील लसीकरणाच्या मोहिमेला गेल्या दोन दिवसांपासून मोठी खीळ बसली आहे. जिल्ह्यात सर्वत्र लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे फक्त ४०० डोस शिल्लक असल्यामुळे मंग‌ळवारपाठोपाठ बुधवारीदेखील जिल्ह्यातील लसीकरण बंदच राहणार आहे.

सध्या शिल्लक असलेल्या चारशेपैकी तीनशे डोस कोविशिल्डचे तर शंभर डोस कोव्हॅक्सिनचे आहेत. बुधवारी जिल्ह्याला ४ हजार ७०० कोविशिल्ड आणि सुमारे दोन हजार कोव्हॅक्सिनचे डोस मिळण्याची शक्यता आहे.

लसींचा तुटवडा पाहता राज्य शासनाने फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले. मात्र, जळगाव जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांनादेखील पुरणार नाही, इतके कमी डोस जिल्ह्याला मिळत आहेत.

सध्या जळगाव जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडे ३०० कोविशिल्ड आणि १०० कोव्हॅक्सिन असे चारशे डोस शिल्लक आहेत. त्यातील कोविशिल्डचे १४० डोस हे जिल्हा रुग्णालयाकडे आहेत. तर भुसावळला ८० सावद्यात ४०, वरणगावला १० आणि अमळगाव ग्रामीण रुग्णालयात ३० डोस शिल्लक आहेत. तर कोवॅक्सिनचे ९० डोस पारोळ्यात आणि अमळनेर झामी चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात १० डोस शिल्लक आहेत. बाकी सर्व लसीकरण केंद्रांवर ठणठणाट आहे. जळगाव महापालिकेच्या एकाही लसीकरण केंद्रावर बुधवारी लस मिळण्याची शक्यता नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज