fbpx

जळगावात भरधाव कंटनेरने पित्यासह मुलाला चिरडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ ।  जळगावातील गुजराल पेट्रोलपंपाजवळील बोगद्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटनेरने दुचाकीस्वार बापासह मुलाला चिरडल्याची घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. नागेश्‍वर भंगी पवार (वय ३५) व त्यांचा पाच वर्षाचा मुलगा कार्तिक नागेश्‍वर पवार दोन्ही रा. दत्त गॅरेजजवळ, पिंप्राळा या दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी कंटनेर चालकास रामानंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत असे की, सासरी राहत असलेल्या सात वर्षीय मोठ्या मुलाला घेण्यासाठी जात असलेल्या नागेश्‍वर पवार यांच्या दुचाकीला कंटनेरने जोरदार धडक दिली. यात बापासह पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर कंटेनरचालक हा घटनास्थळाहून पसार झाला होता. संतप्त नागरीकांनी घटनास्थळी कंटेनरची तोडफोड केली होती. या अपघाताप्रकरणी आज शनिवारी सकाळी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून गुजराल पेट्रोलपंप परिसरात घटनास्थळाजवळच लपून बसलेल्या कंटनेरचालक अर्जुनकुमार सिंग वय ६५ रा. कोलकत्ता यास आज शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रामानंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज