एरंडोल येथे ग्राहक मेळावा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । एरंडोल येथे पंचायत समिती सभागृहात तालुका प्रशासनातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी विनय गोसावी हे होते.

व्यासपीठावर प्रांताधिकारी विनय गोसावी तहसीलदार सुचिता चव्हाण, तालुका ग्राहक फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती ठाकूर, जिल्हा सदस्य कैलास महाजन, शशिकला देशपांडे शिवाजीराव आहीरराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ग्राहकांची जागरूकता, ग्राहकांचे हक्क, ग्राहक चळवळीला चालना देण्याची गरज, याबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रास्ताविक तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नरेंद्र गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन पुरवठा शाखेचे अव्वल कारकून नंदकिशोर वाघ यांनी केले.

यावेळी पुरवठा निरीक्षक संदीप मिळे,अव्वल कारकून ज्ञानेश्वर राजपूत, गोदाम व्यवस्थापक गोपाल शिरसाठ. ज्ञानेश्वर बडगुजर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. यावेळी ग्राहक चळवळीचे सदस्य प्राध्यापक नितीन पाटील उमेश महाजन कुंदन सिंह ठाकुर. दापोरी सरपंच कल्याणी निलेश पाटील शोभना साळी, रघुनाथ कोठावदे, नीलिमा मानधने, डॉक्टर उज्वला राठी, रंजना मराठे, मालती पाटील, पी.जी चौधरी , आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar