fbpx

सालार नगर नाल्याचे बांधकाम चुकीचे : नहीच्या अधिकाऱ्यांना निवेदन

mi-advt

 जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । जळगाव शहरातून जात असलेल्या चौपदरीकरण महामार्गाचे अजिंठा चौफुलीवर उड्डाण फुल याची आवश्यकता असल्याचे जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच सालार नगर जवळील नाल्यावरील चुकीच्या कामा बाबत सुद्धा दुसरे तक्रार अर्ज दाखल केले.

नाल्याचे पाण्याचे प्रवाह विरुद्ध विस्तारीकरण

सालार नगर जवळील अस्तित्वात असलेल्या  नाल्या वरील पुलाचे चौपदरीकरणाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असून ते  काम नाल्याच्या पाण्याच्या  प्रवाहाच्या विरोधात असून पाण्याच्या प्रवाहाच्या समांतर पुलाचे कॉलम अथवा भिंती घ्यायला हव्या होत्या त्या न घेता त्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुलाखालुन येणारे पाणी हे पूर्ण पणे अस्तित्वात असलेल्या कासमवाडी व मासूम वाडी या नागरी वस्तीत घुसेल व त्यामुळे  आर्थिक व जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही अशी तक्रार सुद्धा दुसऱ्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

 अजिंठा चौफुली उड्डाणपूलाचे काम होत असल्यास सालार नगर उड्डाण पूलाचा प्रश्न सुटेल

 अजिंठा चौक उड्डाण पुलाचे काम झाल्यास सालार नगर चे अंडरपास आटोमॅटिक अस्तित्वात येईल व त्यासाठी निधीची आवश्यकता सुद्धा लागणार नाही. कारण राजमार्ग प्राधिकरण चे संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी २६ जुलै रोजी बोलताना अजिंठा चौफुली वरील उड्डाणपुलाची आवश्यकता विविध संघटनांकडून होत असल्याने त्या ठिकाणी उड्डाणपूल करावा. याबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विचार करीत असल्याची बातमी २७ जुलै रोजी प्रसिद्ध  झाल्यामुळे आज मंगळवारी शहरातील मर्यादित सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व  अभियंता यांनी चंद्रकांत सिन्हा यांची भेट घेऊन अजिंठा चौफुली वरील उड्डाण पुलाचे कार्य हाती घ्या म्हणजे सालार नगर- अकसा नगर यामधील अंडरपासचे काम सुद्धा सोईस्कर रित्या पूर्ण करता येईल व मागील दोन वर्षापासून आपण जो एचपी पेट्रोल पंपासमोर बॉक्स(अंडर पास) तयार  करून देण्याचे आश्वासन देत आहात ते सुद्धा होत नसल्याने आपण याच अजिंठा उड्डाण पुलाला लागूनच सदरचे अंडरपास तयार करुन देण्यांत यावे अशी मागणी केलेली आहे.

यांची होती उपस्थिती

सदर निवेदन देताना जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, आरको रोडवेज चे बशीर बुर्‍हानी, मनसे चे जमील देशपांडे, ईदगाह ट्रस्ट चेअनिस शाह, अपनी गल्ली चे अताउल्लाह खान, इंजिनिअरिंग असोसिएशनचे इंजि. जाहिद शेख व जळगाव शहर महानगर काँग्रेसचे अध्यक्ष नदीमकाझी,अल्पसंख्याक शिव सेना महानगर प्रमुख झाकीर पठाण,राष्ट्रवादीचे मझहर खान, अडव्होकेट आमीर शेख, यांची उपस्थिती होती.

दोन्ही कामा बाबत सकारात्मक

चंद्रकांत सिन्हा यांनी दोन्ही निवेदन,तक्रार अयकुन घेतली व दोन्ही मागण्या बाबत सकारात्मक बाजू वरिष्ठ कार्यालयास त्वरित कळवून आपणास सम्पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज