नूतन मराठा महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे संविधान दिन साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । येथील ज.जी.म.वी.प्र.सह.समाजाचे नूतन मराठा महाविद्यालयाच्या बोस सभागृहात साजरा संविधान दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एन.जे.पाटील व मान्यवरांच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.उमेश गोगडीया यांनी आपली भूमिका मांडली.

दरम्यान, प्रमुख वक्ते प्रा.डॉ.उमेश गगोडीया म्हणाले की, संविधान हा भारतीयांना मिळालेला अमूल्य ठेवा आहे. तसेच जसा धर्मग्रंथ हा घराघरात ठेवला जातो तसा संविधान नामक राजग्रंथ देखील घरघरात असला पाहिजे.अस मत व्यक्त केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.एन.जे.पाटील यांनी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशात संविधानाने मताधिकार हा सर्वात मोठा अधिकार प्राप्त करून दिल्याचे सांगितले.संविधानाचे वाचन सहायक प्राध्यापक रविकांत मुंडे यांनी केले.

यांची होती उपस्थिती 

यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.एस.ए.गायकवाड, प्रा. राजेंद्र देशमुख, प्रा.आर.बी.देशमुख तसेच प्रा.डॉ राहुल संदनशिव, डॉ.डी.आर. चव्हाण, प्रा.बी.सी.पाटील, प्रा.इंदिरा पाटील, प्रा. सोनटक्के महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक पौर्णिमा देशमुख, भाग्यश्री पाटील, विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन विशाखा बाविस्कर तर आभार प्रदर्शन चेतन पाटील यांनी केले.

कार्यक्रम सुरू होण्या अगोदर 26/11आतंकवादी हल्ल्यातील शहिदाना श्रद्धांजली वाहण्यात आली.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज