यावल शहरात काँग्रेस कमिटीतर्फे संविधान दिन साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । यावल शहरात काँग्रेस कमिटीतर्फे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल, डिझेल च्या विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी पुकारलेले जनजागरण अभियान यांची सुरुवात यावल येथून प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते झाली.

सोबत गटनेते जि.प.जळगांव तथा तालुकाध्यक्ष मा.प्रभाकर आप्पा सोनवणे, जिल्हाध्यक्ष इंटक मा.भगतसिंग बापु पाटील, शहराध्यक्ष कदिर खान, नगरसेवक रसुल शेठ, नगरसेवक मनोहर, समिर खान, समिर मोमिन, तालुका उपाध्यक्ष सतिश आबा, हाजी गफफार शाह, जि.उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे, महिंद्र ससाणे सर, अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहेमान भाई, एस.एफ अध्यक्ष नईम शेख, विनोद पाटील, विक्की गजरे, अययुब भाई, आदी कार्यकर्ता उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज