जळगावच्या धनाजी नाना महाविद्यालयात संविधान दिवस साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । राष्ट्रीय सेवा योजना एकका तर्फे, आज २६ नोव्हेंबर रोजी ध. ना. चौ. वि. प्र. सं, शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेस वंदन केले.

आज दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रसंगी ध. ना. चौ. वि. प्र. सं, शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय येथे संविधान दिवस साजरा करत याप्रसंगी सर्वांनी सांविधान प्रस्तावनेचे वाचन केले. या कार्यक्रमासाठी मुकेश सावकारे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले. त्यांनी संविधान दिवसानिमित्त भारताचे संविधान, त्याची गरज या विषयावर विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधले. अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन रा.से.यो. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. मिलिंद काळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन रा.से.यो. चे सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ. रवींद्र लढे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या वेळी डॉ. राजकुमार लोखंडे, ग्रंथपाल प्रा. सुनील पाटील, डॉ. संदीप जोशी, प्रा. अनिल सोनवणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना एककाचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज