काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाच पडला ‘मास्क’चा विसर

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । राज्य शासनाकडून सर्वच शासकीय कार्यलयांसह खासगी कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर करणे सक्तीचे केले आहे. असे असतांनाही जळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या पदग्रहण सोहळयात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाच मास्कचा विसर पडल्याचे दिसून आले. दि.२८ रोजी शंभर ते दिडशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला, मात्र या सोहळ्यात केवळ मोजक्याच जणांनी तोंडाला मास्क लावले होते.

कांग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे यांचा पदग्रहण सोहळा गुरुवार दि.२८ रोजी काँग्रेस भवन येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी हे होते. प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, प्रदेश सरचिटणीस विनोद कोळपकर, माजी जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव, माजी महानगराध्यक्ष डॉ. ए.जी. भंगाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, डॉ. उल्हास पाटील, शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे यांनी मनोगत व्यक्त केले.

कारवाई होणार का?
काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला राेखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. तसे आदेश राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी २६ ऑक्टोबर राेजी आदेश काढले असून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. असे असतांना काँग्रेस सारख्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘मास्क’चा वापर न करणे चुकीचे आहे. दरम्यान, गुरुवारी विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. त्याप्रमाणे यांच्यावरही कारवाई होईल का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे. काही दिवसापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर देखील मास्क नसल्याने कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज