fbpx

…तर गिरीश महाजनांना घरी बसवणार : माजी खा.डॉ.उल्हास पाटील

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । भुसावळ, जामनेर तालुक्यातील जागा मित्र पक्षांकडे गेल्या आहेत मात्र त्या ठिकाणी विरोधी उमेदवारांपेक्षा अधिक मताधिक्य काँग्रेसला असल्याने या जागा काँग्रेसला सोडाव्यात, अशी मागणी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी येथे केली. 

ते म्हणाले की, भुसावळ काँग्रेसचा मूळ गाभा असून येथे काँग्रेसला जागा लढवायची आहे. जामनेरातही काँग्रेसला जागा मिळाल्यास माजी मंत्री गिरीष महाजन घरी बसल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. रामानंद मंगल कार्यालयात पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर काँग्र्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार नीळकंठ फालक, प्रवक्ते अतुल लोंढे, अश्‍विन लोंढे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुन्वर खान, अ‍ॅड.अविनाश भालेराव, विरेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष रवींद्र निकम, जामनेर तालुकाध्यक्ष एस.टी.पाटील, संतोष सावळवे, शैलेश आहिरे, महिला आयोगाच्या माजी सदस्या जोत्स्ना विसपुते, युवक जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज