एरंडोलात वार्ताहरांचा सत्कार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । एरंडोल येथे नगरपालिका व इतर संस्थांतर्फे पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा सत्कार मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य बी.डी.बागुल हे होते.

लोकशाहीच्या जडणघडणी मध्ये पत्रकारांची भूमिका मोलाची असुन समाजप्रबोधन व जनजागृती करून समाजास व इतर क्षेत्राना योग्य दिशा दाखविण्याचे काम पत्रकारांचे असल्याचे प्रतीपादन नगरपालिकेचे प्रशासक विकास नवाळे यांनी केले.
यावेळी शिवाजीराव अहीरराव, आल्हाद जोशी, कमरअली सैय्यद, कैलास महाजन, रतीलाल पाटील, शैलेश चौधरी, नितीन ठक्कर, कुंदन ठाकुर, प्रा.नितीन पाटील, राजधर महाजन, उमेश महाजन आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक व आभार प्रदर्शन न.पा.चे कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी यांनी केले. सुत्रसंचालन पंकज महाजन यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष देविदास सोनवणेंचा व प्रल्हाद पाटील, राहूल मराठे, चंद्रभान पाटील, बाबुलाल महाजन, मनोहर ठाकुर, रोहिदास पाटील, संजय बागड, नितीन पाटील, अजय महाजन, भिला पाटील, गणेश महाजन, प्रविण महाजन, उमेश महाजन, नितीन ठक्कर यांच्या आस्था महीला मंडळातर्फे ऍड. मोहन बी.शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -