यावल तालुका काँग्रेसतर्फे आयोजित जनजागृती अभियानाचा समारोप

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाई विरोधात काँग्रेस कमिटीकडून दि.१४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान यावल तालुक्यासह शहरात जनजागृती करण्यात आली. या जनजागृती अभियानाचा समारोप सोमवार दि.२९ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या आदेशावरून व तालुकाध्यक्ष तथा जि.प. गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावल तालुका काँग्रेसच्यावतीने तालुक्यासह शहरात केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाई विरोधात जनजागृती अभियान राबविण्यात आले. अभियानादरम्यान, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ झालीच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती म्हणजेच दि.१४ नोव्हेंबरपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. तब्बल १५ दिवस चाललेल्या या अभियानाचा समारोप सोमवार दि.२९ रोजी झाला.

यावेळी इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, शहराध्यक्ष कदिर खान, शेतकी संघ संचालक अमोल भिरूड, जेष्ठ नगरसेवक रसुल शेठ, युवक जिल्हा उपाध्यक्ष ईमरान पहेलवान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, मागासवर्गीय शहराध्यक्ष विक्की गजरे, विजय जावरे, अस्लम सर, सतिश बडगुजर, नाना तायडे, अयुब खान, लुकमान तडवी, सागर बडगुजर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -