जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२४ । जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन जळगाव महाविद्यालयात स्थानिक लिबीटी इन्फोटेक प्राईवेट लिमिटेड सेंटरद्वारे आयोजित ‘सी ’ प्रोग्रामिंग कार्यशाळेचा नुकताचा समारोप करण्यात आला. ११ मार्च ते १५ मार्च २४ आयोजित करण्यात आली होती.
लिबीटी इन्फोटेकच्या संचालक दिव्या पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले, त्यांच्यासोबत बेसिक सायन्स अँड ह्यूमॅनिटी विभाग प्रमुख डॉ. नितीन भोळे, त्यांच्यासोबत कार्यशाळेचे समन्वयक प्रा देवपाल यादव , प्रा संजय चौधरी हे उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. नितीन भोळे यांनी महाविद्यालयात कार्यशाळेप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात व अशा प्रकारच्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवणे गरजेचे असते, जेणेकरून विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढीस लागेल. कार्यशाळेच्या प्रथम दिवशी सहभागींनी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या ‘सी ’ ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज संगणक प्रणालीची निर्मिती, सिस्टिम प्रोग्रामिंग इ. ठिकाणी हिची सूक्ष्म स्तरावरील नियंत्रण क्षमता व उच्च स्तरावरील भाषेप्रमाणे सुगमता उपयोगी पडते.
“सी ” ला संगणक भाषांची जननी यावर उहापोह करण्यात आला.कार्यशाळेच्या दुसर्या दिवशी विद्यार्थ्यांना “सी ” कंपायलर, डेटा टाईप चे प्रकार, ऑपरेटर चे प्रकार या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले तसेच प्रात्यक्षिक ही घेण्यात आले. डेटा टाईप चे प्रामुख्याने तीन प्रकार इंट , फ्लोट आणि कॅर माहिती देण्यात आली. कार्यशाळेच्या तिसर्या दिवशी विद्यार्थ्यांना कंट्रोल फ्लो स्टेटमेंट या विषयावर माहिती दिली गेली तसेच प्रात्यक्षिक ही घेण्यात आले. कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांना रे या विषयावर माहिती दिली गेली. कार्यशाळेच्या पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांना स्ट्रक्चर या विषयावर माहिती देतांना वेगवेगळे डेटा टाइपच्या व्हॅल्यूचा सेट असतो तसेच स्ट्रक्चर घोषित केल्यानंतर आपण स्ट्रक्चर ची व्हेरिएबल घोषित करू शकतो. लिबीटी इन्फोटेकच्या दिव्या पाटील यांनी सहभागींच्या समर्पणाबद्दल प्रशंसा केली आणि संगणक विज्ञानाच्या सतत विकसित होत असलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला.
परिश्रमशील सहभागींना प्रमाणपत्रे देऊन कार्यक्रमाची सांगता झाली,सदर कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉक्टर उल्हास पाटील व सदस्या डॉक्टर केतकी पाटील यांनी कौतुक करत भाषा कार्यशाळातून भावी जिवनात संशोधक घडवण्यास मदत होते असे सांगितले.कार्यशाळेचे सूत्रसंचालन व समारोपा प्रसंगी आभार प्रदर्शन प्रथम वर्ष संगणक विभागाची विद्यार्थिनी नीलाक्षी बर्डे हिने केले.