बेंटली सिस्टीम इंडिया प्रा.लि.(पुणे) कंपनीकडून आदर्श प्राथमिक शाळा अडावदला संगणक संच व प्रोजेक्टर भेट

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | ६ सप्टेंबर २०२१ | श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित आदर्श प्राथमिक शाळा अडावद ता.चोपडा.जि.जळगाव या शाळेला पुणे येथील बेंटली सिस्टीम इंडिया प्रा.लि.या कंपनीकडून संगणक संच व प्रोजेक्टर संच देण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित संस्थेचे अध्यक्ष भगवान शामराव महाजन, उपाध्यक्ष आप्पासो वासुदेव नारायण महाजन.संस्थेचे सचिव रमेश आनंदा पवार व केंद्रप्रमुख अशोक सैदाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून बेंटली सिस्टीम या कंपनीत कार्यरत असलेले समाधान धनगर उपस्थित होते .

कार्यक्रमात सर्वप्रथम कंपनीचे प्रमुख म्हणून समाधान धनगर यांच्या सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव नारायण महाजन यांनी केला.

कार्यक्रमात माहिती व तंत्रज्ञानाचा युगात संगणक संच व प्रोजेक्टर विद्यार्थ्यांना किती महत्त्वाचे आहे हे आपल्या मनोगतातून व्ही एम महाजन सांगितले . कार्यक्रमात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ईश्वर मिस्तरी,रविंद्र महाजन,कैलास महाजन,अशोक महाजन यांनी मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे सुत्रंसंचालन रविंद्र महाजन यांनी केले व कार्यक्रमाचा शेवटी एस जी महाजन यांनी आभार मानले.

या शिक्षकांची होती उपस्थिती

देविदास महाजन,रविंद्र महाजन,सुधाकर महाजन,योगेश साळुंके,दिनकर वाघ,शिक्षिका कामिनी चौधरी उपस्थित होते .माध्यमिक विभाग आर डी माळी सर,आर के पिपंरे,एन ए महाजन,व्ही एम महाजन,एस जी महाजन,पी आर माळी,एम एन माळी,एस के महाजन ,एस बी चव्हाण,पी एस पवार उपस्थीत होते

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -