fbpx

येत्या १५ दिवसांत अमृतचे काम पूर्ण करा – मनसे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ ।  महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी येत्या १५ दिवसांत अमृतचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात अली.

संपूर्ण जळगांव शहरामध्ये अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजना अंतर्गत खोदण्यात येत असलेल्या चाऱ्यांचे काम हे पूर्ण झाल्यानंतर त्या संपूर्ण व्यवस्थित बुजणे व त्यांचे डांबरीकरण करणे ही संपूर्ण जबाबदारी मक्तेदाराची आहे परंतु संबंधित मक्तेदाराकडून ती जबाबदारी व्यवस्थित पणे पार पाडल्याचे दिसून येत नाही. तसेच मलनिस्सारण योजना अंतर्गत खोदण्यात येत असलेल्या भुयारी गटारी हे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर चारी बुजविण्याची जबाबदारी ही मक्तेदाराची जरी असली तरी डांबरीकरण करणे याची जबाबदारी ही म.न.पा.ची आहे. परंतु म.न.पा.कडून देखील ही जबाबदार पार पाडण्यात येत नाही.

यामुळे संपूर्ण जळगाव शहर ऐन पावसाळ्यात रस्ते खोदकाम झाल्यामुळे चिखलमय झालेले आहे त्यामुळे शहरातील मोटार सायकल व चारी चाकी वाहन चालक यांना वाहने चालवितांना खूपच कसरत करावी लागते. त्यातच अनेक वेळा लहान-मोठे अपघात सुध्दा घडत आहेत. संबंधित चालू असलेले काम हे येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्यात यावे. व  कुठेही नविन खोदकाम करण्यात येऊ नये, नविन पाणीपुरवठा व मलनिस्सारणे चे खोदकाम जर निदर्शनास आले तर ते संबंधित काम हे त्या क्षणी जागेवरच मनसे कडून बंद पाडण्यात येईल व संपूर्ण जळगाव शहरातीलज्या रस्त्यांचे खोदकाम झालेले आहे ते मुरुम टाकून डागडुजी करुन व्यवस्थित तसेच संबंधित संपूर्ण काम हे पावसाळ्याचे ४ महिने सद्यस्थितीत बंद ठेवण्याचे आदेश आपणांकडून संबंधितांना करण्यात यावे व जनतेची या चिखलमय रस्त्यातून सुटका करावी असे निवेदन मनसे तर्फे आयुक्त सतीश कुलकर्णी यांना देण्यात आले.

यावेळी मनसे जिल्हा संघटक राजेंद्र निकम,राजू बाविस्कर,महेश माळी,गणेश नेरकर,गोविंद जाधव,विशाल कुमावत,निलेश अजमेरा,संतोष सुरवाडे,रमेश भोई,मनोज भोई,निलेश खैरनार,बळीराम पाटील,अॅड.दिनेश चव्हाण,मंगेश भावे,संकेत सोनार,अजय परदेशी,भाईदास बोरसे, संदिप पाटील इ.दिले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज