fbpx

विरावली सरपंच, उपसरपंचबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची तक्रार

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । विरावली गावात सन 2020-2021 मध्ये निवडून आलेले सरपंच, उपसरपंच व तीन ग्रा.प.सदस्य यांच्याविरुद्ध अतिक्रमण तर उपसरपंच यांचे तीन अपत्य असल्याबाबत तसेच ग्रा.प कारभारात सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हस्तक्षेप करत असल्याबाबत राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य अ‍ॅड. देवकांत पाटील यांच्यासह युवक राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष पवन पाटील यांनी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर यांना तक्रारी अर्ज देत कार्यवाहीची मागणी केली.

सरपंच कलीमा फिरोज तडवी यांचे व सासरे, पती, दीर यांच्या परिवारातील सदस्यांचे राहते घर सरकारी जागेवर अतिक्रमण आहे. उपसरपंच मनीषा विश्वनाथ पाटील यांच्या पती सासरे यांचे राहते घर व दीर यांचे घर व दुकान हे अतिक्रमित जागेत आहे. व त्याच बरोबर उपसरपंच यांना 2001 नंतर तीन अपत्य आहेत

तर ग्रा.प सदस्य तुषार(मुन्ना) पाटील यांचे घर सरकारी जागेवर अतिक्रमण असून नमुना नंबर 8 मध्ये घर क्र 78 यात व्हाईटर लावून मूळ क्षेत्र फळात बदल केला आहे. शासकीय दस्तवेज मधून पुरावे नष्ट करणे व ग्रा प दस्तऐवजा मध्ये त्यांनी सरपंच यांच्या मदतीने मूळ दस्ताऐवजामध्ये फेरफार केली आहे. त्यामुळे ग्रा.पं दस्ताऐवजाना धोका निर्माण झाला आहे.  ग्रा प सदस्य नथू नामदेव अडकमोल यांचे सरकारी जागेवर घर व दुकानाचे चे अतिक्रमण आहे. सदस्य इब्राहीम दलशेर तडवी यांचे व त्यांचे परिवाराचे देखील सरकारी जागेवर अतिक्रमण असून सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हे नेहमीच ग्रा.प मासिक मीटिंग व इतर ग्रा प कामात हस्तक्षेप करत असतात.

तरी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण, 2001 नंतर तीन अपत्य व ग्रा.प. कामात कामात हस्तक्षेप करणे याची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही व्हावी व ग्रामपंचायत विरावली सरपंच उपसरपंच व इतर सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करण्यात अशी मागणी केली. .

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज