fbpx

सावदा येथील निमजाय माता रस्त्याच्या खडीकरणाला सुरवात

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । दोन दिवस आधी सावदा शहरातील निमजाय माता मंदिराच्या समितीने मुक्ताई नगर मतदारसंघाचे आ.चंद्रकांत पाटील यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी रस्ता व स्ट्रीट लाईटची मागणी केली होती. आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी आमदारांनी दोन दिवसात रस्त्याचे काम सुरु होईल असे आश्वासन त्याच वेळी दिले व लगेच रस्ता करण्यास संदर्भातल्या सूचना दिल्या होत्या. त्या आश्वासनाची लागलीच पूर्तता देखील त्यांनी केली व रस्त्याचे आज प्रत्यक्ष कामाला नारळ वाढवून सुरुवात करण्यात आली. यामुळे भाविकात समाधानी व्यक्त होत आहे.

mi advt

कामाचे भूमिपूजनप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, शहरप्रमुख सुरज परदेशी, भरत नेहते, अतुल नेमाडे, गौरव भैरवा, निलेश खाजणे, एडवोकेट धनंजय चौधरी, सचिन बराटे, मनीष भंगाळे, गणेश माळी, तिमा नेमाडे, ईश्वर नेमाडे, रितेश वारके आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज