डांभुर्णी येथे स्वयंदिप प्रतिष्ठानच्या ई -श्रम कार्ड नोंदणीची सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे स्वयंदीप प्रतिष्ठान आयोजित ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप तसेच स्वयंदीप प्रतिष्ठान संचालित- सेतू सुविधा केंद्राचे उदघाटन आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले.

दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गावातील मुख्य चौकात प्रातिनिधिक स्वरूपात १० लाभार्थ्यांना ई-श्रम कार्ड प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या ई-श्रम कार्ड नोंदणी साठी शिबीर (कॅम्प) चेही मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करून सेवेचा प्रारंभ डांभुर्णी गावापासून करण्यात आला तसेच पुढे हे शिबिर उंटावद,चिंचोली, डोणगाव ,कोळन्हवी आडगाव -कासारखेडा ह्या पंचकृषितील गावामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाची प्रस्तावना स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव-संदीप पाटील (सोनवणे) यांनी केले व ई-श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच मजूर यांच्यासाठी कसे उपयुक्त आहे याचे उद्दिष्ट काय याबाबतीत स्पष्टीकरण देऊन ग्रामीण भागात असंघटित क्षेत्रात येणाऱ्या मजुरांची विशेषतः ह्या गटात मोडणाऱ्या महिलांची संख्या मोठया प्रमाणात आहे. म्हणून ग्रामीण भागात असा उपक्रम जास्त संयुक्तिक ठरतो असे प्रतिपादन केले.

या  कार्यक्रमात नानासाहेब आर.जी पाटील ,कासारखेडा सरपंच भागवत पाटील,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राम पवार ,स्वराज्य ग्रुपचे आण्णासाहेब शंभू सोनवणे आणि रामचंद्र चौधरी यांनी मनोगते व्यक्त करून ह्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेछ्या दिल्या व शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच कार्यक्रमात उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे आभार ग्रामपंचयात सदस्य शुभम विसवे यांनी मानले व सूत्र संचालन स्वयंदीप चे संचालक शैलेश शिरसाठ व स्वयंदीप शासकीय योजना माहिती व सहकार्य समितीचे सदस्य देवानंद कोळी यांनी केले.

दरम्यान आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे तसेच नानासाहेब आर.जी पाटील आणि शिवश्री रामदादा पवार यांच्या हस्ते स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव संदीप पाटील (सोनवणे) यांचा देखील सत्कार महिला शक्ती केंद्र (जिल्हा स्तरीय महिला समिती)वर नियुक्ती झाल्याबाबद्दल करण्यात आला. कार्यक्रम आटोपल्यावर सर्व मान्यवरांनी स्वयंदीप प्रतिष्ठान संचलित अभ्यासिका व ग्रंथालयास भेटी दिल्या व स्वयंदीप ने आज पर्यंत घेतलेल्या विविध सामाजिक व शैक्षणिक प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.

या कार्यक्रमास शशिकांत पाटील,अनिल साठे,गावच्या सरपंच सौ.कल्पना बाविस्कर, सौ.प्रतिभा बाविस्कर,नानासाहेब विजय पाटील,विकास (गोटू) सोळुंखे, धनंजय कीर्तने,विलास भंगाळे,किरण पाटील ह्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच गावातील ग्रामस्थ, तलाठी बारेला आप्पा, ग्रामविकास अधिकारी गोसावीभाऊ साहेब ,पत्रकार मनोज नेवे, गिरिश विसवे यांचीही उपस्थीत लाभली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्वयंदीप शासकीय योजना माहिती समितीचे सहकार्य लाभले तसेच कुंदन पुंडलिक कोळी, देवानंद कोळी,उमाकांत पाटील, प्रदीप कोळी व प्रेमचंद भगवान सोनवणे यांची नियोजनात अत्यंत महत्वाची भूमिका होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज