दिलासा : चाळीसगावात ५८ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ६७ कोटी वर्ग

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यात शासनातर्फे शेतकऱ्यांना भरपाईपोटी ७० कोटींचे अनुदान महसूल प्रशासनास प्राप्त नुकतेच झाले हाेते. आतापर्यंत चाळीसगाव तालुक्यात ५७ हजार ७४१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ६७ कोटी ६१ लाख ६९ हजार रूपये जमा करण्यात आले आहे. निम्मे नुकसानग्रस्तांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली असून, तर उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या दोन-तीन दिवसात रक्कम वर्ग होईल, अशी माहिती येथील तहसीलदारांनी दिली.

तालुक्यात अतिवृष्टीमुळे ८४ हजार ४८६ हेक्टर शेतीक्षेत्र बाधित झाले होते. यात १३७ गावातील ७५ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या मार्गदर्शनातून प्रशासनाने अहवाल पाठवला होता. त्यानुसार ७० कोंटींचे अनुदान प्राप्त झाले हाेते. मंगळवारपासून हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले जात आहे.

प्राप्त झालेले अनुदान बँकांना केले अदा

ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण अनुदान ७० कोटी ९८ लाख ४० हजार १२० रूपये मात्र इतके प्राप्त झालेले आहे. त्यापैकी १० नोव्हेंबरपर्यंत ६७ कोटी ६१ लाख ७९ हजार ५११ रूपयांचे अनुदान ५७ हजार ७४१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बॅँकांना अदा केल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज