जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : शहरातील चार रस्त्यांसाठी सहा काेटींचा निधी खर्चाला मंजुरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या ८ रस्त्यांच्या कामांपैकी ४ रस्त्यांच्या कामासाठी ६ कोटी रुपये खर्चाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच निविदा प्रसिद्ध होऊन या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगराेत्थान महाअभियानातंर्गत १३ काेटी रूपयांच्या निधीतून शहरातील आठ रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. दरम्यान, या ८ रत्यांपैकी चार रस्त्यांसाठी सहा काेटी रूपयांच्या खर्चाला जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे दाेन दिवसात कामांची निविदा प्रसिद्ध केली जाणार असून महिनाभरात कामांना सुरूवात हाेणार आहे.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये शास्त्री टाॅवर ते भिलपुरा ते ममुराबाद पुलापर्यंत रस्ता डांबरीकरणासाठी १ काेटी ५२ लाख ९३ हजार १४४ रूपये, प्रभाग क्रमांक ६ आणि प्रभाग क्रमांक १६ मध्ये पांडे डेअरी चाैक ते इच्छादेवी चाैकापर्यंत डांबरीकरण कामासाठी दाेन काेटी रूपये, प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील स्वातंत्र चाैक ते नेरीनाका चाैकापर्यंत रस्ता डांबरीकरणासाठी १ काेटी ५१ लाख ८४ हजार ७०५ रूपये, पुष्पलता बेंडाळे चाैक ते पांडे डेअरी चाैक पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामासाठी ८७ लाख १३ हजार ८५० रूपयांची कामे करण्यात येणार आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज