⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरीची संधी.. कोल इंडियामध्ये मोठी पदभरती जाहीर, लाखो रुपये पगार मिळेल

सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरीची संधी.. कोल इंडियामध्ये मोठी पदभरती जाहीर, लाखो रुपये पगार मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नोकरीचा शोध घेत असलेल्या तरुणांसाठी नोकरीची एक संधी आहे. कोल इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठी (Coal India Recruitment 2022),अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार कोल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट coalindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा – 481

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

कार्मिक आणि HR – किमान दोन वर्षे पूर्णवेळ पोस्ट असलेले पदवीधर पदवीधर पदवी/पीजी डिप्लोमा पर्यंत शिक्षण आवश्यक.

पर्यावरण – पर्यावरण अभियांत्रिकी पदवी पर्यंत शिक्षण आवश्यक.

साहित्य व्यवस्थापन – इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील अभियांत्रिकी पदवी किमान 60% गुणांसह 2 वर्ष पूर्ण वेळ MBA/ PG डिप्लोमा इन मॅनेजमेंट.पर्यंत शिक्षण आवश्यक.

विपणन आणि विक्री – किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून मार्केटिंगमधील स्पेशलायझेशन (मेजर) सह 2 वर्षे पूर्णवेळ एमबीए / पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंटसह मान्यताप्राप्त पदवी असणं आवश्यक.

समुदाय विकास – सामाजिक कार्यात किमान 2 वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक.

कायदेशीर – किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून 3 वर्षे / 5 वर्षे कालावधीचे कायद्यातील पदवीधर असणं आवश्यक.

जनसंपर्क PR – पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविका (पूर्णवेळ अभ्यासक्रम) पत्रकारिता/ जनसंवाद/ जनसंपर्क यातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण आवश्यक.

सहयोगी सचिव – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक.

वयोमर्यादा: 30 वर्षे (SC/ST 5 वर्षे सूट OBC- 3 वर्षे सूट)

वेतन श्रेणी: 50,000/- ते 1,80,000 रु

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2022

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.