यावलात कोळसा भट्टी,अनेक वृक्षांची कत्तल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल महसूल व वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे कोळसा भट्ट्या बिनधास्तपणे सुरू झालेल्या आहेत. याकडे यावल पूर्व-पश्चिम वनक्षेत्रपाल व तहसीलदार यांचे दुर्लक्ष आहे का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

यावल पूर्व-पश्चिम वनविभाग कार्यालय तसेच यावल तहसील कार्यालयापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर बोरावल,टाकरखेड़ा,भालशिव पिंप्रि परिसरात तसेच हतनूर धरण पाटाच्या आजूबाजूस तसेच तापी नदीच्या किनारपट्टी या भागात हजारो बाभुळ व इतर वृक्षांची अनाधिकृतपणे कत्तल करून त्या लाकडांची भट्टी लावून लाकडे जाळून हजारो टन कोळसा निर्मिती करण्याच्या भट्ट्या सुरू झालेल्या आहेत. याकडे यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल तसेच यावल तहसीलदार यांनी आपले लक्ष केंद्रित करून कोळसा भट्टी माध्यमातून कोळसा विक्री व्यवसाय करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी, मागणी संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -