उद्यापासून निवळणार ढगाळ वातावरण, २१ नंतर पुन्हा वाढणार थंडी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । यंदा ऐन हिवाळ्यात राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे राज्यात थंडीची चालूल वाढली आहे. दरम्यान, उद्या रविवारपासून राज्यावर घाेंगावत असलेले ढगाळ वातावरण हळूहळू निवळून हवामान काेरडे राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील सध्या किमान तापमान वाढू लागले आहे.

उत्तरेतील थंड वाऱ्यांमुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर वाढला आहे. दिवसादेखील थंडीची चाहूल लागत आहे. काल शुक्रवारी वातावरणात काहीसा बदल झाला. किमान तापमान १२ अंशांवरून पुन्हा १५ अंशांपर्यंत वाढले आहे. दिवसा तापमान २५ अंशांवर असल्याने दिवसा हवेतील गारठा मात्र काहीसा कायम हाेता.

२१ नंतर थंडी वाढणार
रविवारपासून ढगाळ वातावरण पुन्हा निवळून उन्हाची तीव्रता वाढेल. आठवडाभर हवामान काेरडे राहील तर आठवड्याच्या शेवटी २१ तारखेनंतर पुन्हा थंडीची तीव्रता वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -